शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील आ. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे देखील आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, शिवसेना पदाधिकारी दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, देविदास पालोदकर, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, विशाल जाधव, प्रशांत जोशी, शिवा टोम्पे, शेख इम्रान (गुड्डू), सयाजीराव वाघ, लताबाई जाधव, आसिफ बागवान, मतीन देशमुख, जगन्नाथ कुदळ, सखाराम आहिरे, सुनील पांडुरंग दुधे, सचिन साळवे, भावराव दुधे, वसीम हुसेन, फहिम पठाण, दिलीप वाघ, कृष्णा वाघ, डॉ. फेरोज खान, राम तसेवाल, आनंद सिरसाट, कैलास जायभाय, गणेश संदनसे, बॉबी चौधरी, सतीश सिरसाट, गणेश वाघ किरण वाघ, आदींची उपस्थिती होती.